Permanent E Waste Collection and Recycle Project

 

 

 

रोटरीचे ई कचरा संकलन केंद्र

टेक्नॉलॉजीच्या जमान्यात ई कचरा मुळे नवा प्रश्न निर्माण झाला आहे. आयटी इंडस्ट्री बरोबर इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज मधून फार मोठ्या प्रमाणात ई कचरा तयार होत आहे. तसेच आपल्या घरातून व ऑफिसमध्ये ई-कचऱ्याचे प्रमाण वाढते आहे. ज्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाच्या समस्या निर्माण होत आहेत.

ई कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची ?त्याची निर्गत कशी करायची ? त्याचा पुनर्वापर कसा करावयाचा ? असे नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. कायद्याअंतर्गत ई-कचरा आपण कुठेही तसेच आपल्या नेहमीच्या कचऱ्यातूनही टाकू शकत नाही.

रोटरीच्या माध्यमातून कायमस्वरूपी ई कचरा संकलन करण्याचा प्रकल्प रोटरी समाजसेवा केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे.

आपल्या सर्वांचे बहुमोल सहकार्याची अपेक्षा आहे.

ई कचरा मध्ये खालील पार्ट किंवा भाग तुम्ही संकलन केंद्रामध्ये आणून ठेवू शकता.

कॉम्प्युटर हार्डवेअर
प्रिंटर्स
लॅपटॉप
मॉनिटर
स्कॅनर
कॉपीअर
केबल्स
मोटर्स
फॅन
वॉशिंग मशीन
फ्रिज
स्पीकर
टेलिफोन सिस्टम
मोबाईल
अडॅप्टर्स
बॅटरीज
युपीएस सिस्टीम
टीव्ही
अप्लायन्सेस
सोलर सिस्टम
डायग्नोस्टिक इक्विपमेंट
इलेक्ट्रॉनिक खेळणी

वरील कोणतेही मटेरियल आपल्याकडे, आपल्या परिवारात किंवा आपल्या मित्रांकडे पडून असल्यास खालील पत्त्यावर जमा करण्यास प्रवृत्त करावे ही नम्र विनंती.

रोटरी समाजसेवा केंद्र,
श्री माधवप्रसाद गोएंका भवन,
महावीर गार्डन जवळ,
कलेक्टर ऑफिस रोड,
कोल्हापूर.


धन्यवाद

डॉ अभिजीत हावळ
9371102880