Community Service

 

 

Health Check-up and Blood Donation Camp

Date: 01st June 2026
Project: Health Check-up and Blood Donation Camp
Community Service Director: Rtn. Shobha Arvind
Event Chairperson: Rtn. Dr Abhijeet Haval and Rtn. Shankar Patil
Venue: Parvati Hall, Latawade, Kolhapur

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर व हिंदुराव पाटील चॅरिटेबल फाउंडेशन लाटवडे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक ०१ जुन २०२६ रोजी भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

त्यामध्ये रोटरी वाचा व श्रवण संस्था सहभागी झाली होती. या शिबिरामध्ये एकूण 36 रुग्णांची नाव नोंदणी झाली असून सर्व रुग्णांची श्रवण चाचणी करण्यात आली. गरजू कर्णबधिर रुग्णांना श्रवणयंत्र सवलतीच्या दरात देणार आहोत. शिबिरामध्ये दोन कर्णबधिर व मतिमंद मुलांना स्पीच थेरपी देण्यात आली.

रक्तदान शिबिरामध्ये शोभा के शाहू ब्लड बँकेची पूर्ण टीम उपस्थित होती. लोकांनी उत्साहाने ब्लड डोनेशन केले ज्यामध्ये 52 बाटल्यांचे कलेक्शन झाले.

तसेच ऑर्थोपेडिक व जनरल चेकअप करताना ऑरेंज हॉस्पिटलची टीम व डॉक्टर वैभव सासुरकर यांनी 181 पेशंट्स तपासले.

ऑरेंज हॉस्पिटल तर्फे डॉक्टर पूजा सासुरकर यांनी डोळे तपासणीसाठी आलेले 131 पेशंट तपासले.

सदर शिबिरामध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर चे अध्यक्ष रो. प्रदीप कारंडे, सेक्रेटरी रो निलेश कुटेरोटरी समाज सेवा केंद्राचे अध्यक्ष रो. गिरीश जोशी, रोटरी वाचा व श्रवण केंद्राचे चेअरमन रो. अभिजीत हावळ, शाहू ब्लड बँकेचे चेअरमन रोटर अविनाश रास्ते तसेच हिंदुराव पाटील चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन रो. शंकर पाटील तसेच रो अजिंक्य कदम, PDG प्रताप पुराणिक, रो अरविंद कृष्णन, रो प्रदीप पासमल यांची उपस्थिती होती.

एक जून रोजी शंकर पाटील यांचा वाढदिवस होता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमास लाटवडे परिसरातील 500 लोक उपस्थित होते व शिबिर हे सकाळी नऊ वाजता सुरू झाले व दुपारी चार वाजता त्याची सांगता झाली.